Vougue Magazine
Business Report Guideline
Today's English
घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा
"बालपणीचे कुतूहल हेच उद्याच्या विज्ञानाचा पाया असते!"
सभोवताली घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले अतिशय बारकाईने पाहत असतात. अशा अनेक प्रश्नांचे कुतूहल आणि जिज्ञासा त्यांच्या मनात सतत निर्माण होत असते. या प्रत्येक घटनांमागील वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून घेण्याचा मुले प्रामाणिक प्रयत्न करत असतात.
आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजत कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु, हे सुप्त गुण फुलवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष प्रायोगिक कौशल्ये व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या व्यासपीठाची गरज आहे.
हीच गरज ओळखून, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त वैज्ञानिक गुणांना चालना देण्यासाठी 'निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन' च्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि तार्किक विचारसरणीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करत आहोत. हा केवळ एक पेपर-पेन्सिल कौशल्याचा कसोटीचा मार्ग नाही, तर विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या रंजक जगाची सफर घडवणारा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांमधील 'असे का आणि कसे?' या प्रश्नांचा शोध घेण्याची वृत्ती वाढवणे.
केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर समजून घेण्यास मदत करणे.
राज्यस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे.
विज्ञानासोबतच जगाचे भान देणाऱ्या सामान्यज्ञानाचा (General Knowledge) पाया मजबूत करणे.
'निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन'चा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्याला वैज्ञानिक विचार करण्याची संधी मिळावी. या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या पाल्याच्या पंखांना वैज्ञानिक विश्वाची 'घे भरारी' घेण्याचे बळ द्या!